बाळ: १ वर्षाचे

आता काळजी घ्या, तुमचे बाळ आता शोधाशोध करु शकते!

बाळा, वाढदिवसाच्या शुभेच्छा! लवकरच, तुमचे बाळ अधिक स्वतंत्र होईल, त्याची विनोदीबुद्धी तयार होईल व सर्वात महत्वाचे म्हणजे ते तुमच्यावर प्रेम करते हे सांगायला शिकेल.

तुमच्या बाळाला अजूनही तुम्ही त्याला सोडून जाणे आवडणार नाही. हे नैसर्गिक आहे. अच्छा करायला भरपूर वेळ असेल, तर त्याला जुळवून घ्यायला वेळ मिळेल.

तुमचे बाळ पूर्ण शब्द उच्चारते तेव्हा अतिशय आनंद होतो. मात्र त्याला अजूनही शब्दांचा वापर करुन त्याला जे म्हणायचे आहे किंवा त्याला कसे वाटते हे सांगता येणार नाही. ते काही वेळा शारीरिक भाषा वापरेल. ते कदाचित “वर” साठी हात उंचावेल किंवा “ते काय आहे?” साठी बोट दाखवेल.

ते कदाचित अनेक गोष्टींसाठी एकच शब्द वापरेल. त्याचा सूर ऐका. ते एकच शब्द विविध हावभाव वापरुन वेगवेगळ्या प्रकारे म्हणेल.

ते आता अंगठा व तर्जनीचा वापर करुन वस्तू सहजपणे उचलू शकेल. ते आता त्याला जमिनीवर सापडलेल्या वस्तू उचलून तोंडात घालू शकते. त्यामुळे त्याला अपाय होणार नाही याची खात्री करण्यासाठी फरशीवर काय आहे ते पाहा.

ते तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करते. लहान मुलांना विविध लोकांची विशेषतः त्यांच्या आईवडिलांची नक्कल करायला आवडते. अशाच प्रकारे ते शिकतात. ते तुमच्या भाषेतील शब्दांची व स्वरांचीही नक्कल करेल.

त्याचे आता बरेच दात आले असतील. ते लहानशा मऊ केसांच्या ब्रशने थोडीशी टूथपेस्ट लावून स्वच्छ घासा.

तुमच्या गोंडस बाळाकडे पाहून तुम्ही त्याचासोबत केलेला प्रवास आठवा – छोट्याशा असहाय्य नवजात बाळापासून ते जोशपूर्ण १ वर्षाच्या बाळापर्यंत.

भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.


कृमी: मी तिचे संरक्षण कसे करु?

तुमच्या बाळाला जमीनीतून किंवा असुरक्षित पाण्यातून कृमी होऊ शकतात व त्यामुळे ते अतिशय आजारी होऊ शकते.

तुमचे बाळ फरशीवर झोपण्यापूर्वी, रांगण्यापूर्वी किंवा खेळण्यापूर्वी फरशी साबणाने व पाण्याने स्वच्छ करुन घ्या. यामुळे ते सुरक्षित राहू शकेल. तुम्हाला फरशी स्वच्छ करता येत नसेल तर त्यावर एक मोठी, स्वच्छ सतरंजी किंवा चटई घाला.

तुमचे बाळ जसे मोठे होत जाते, तसे तुमच्या बाळाला बाहेर खेळायला आवडेल, मात्र काही ठिकाणी कृमींची समस्या असते. कृमी जमीनीतून किंवा मातीतून होऊ शकतात, व त्यामुळे पोट दुखू शकते, खोकला येऊ शकतो व ताप येऊ शकतो.

तुमचे बाळ बाहेर चालू लागल्यावर त्याला जाड पायमोजे, रबरी चपला किंवा शूज् घातल्यास तुमच्या बाळाचे संरक्षण होण्यास मदत होऊ शकते. त्याचे हात साबणाने व स्वच्छ, सुरक्षित पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही त्याची नखे नियमितपणे स्वच्छ करणेही महत्वाचे आहे. यामुळे ते जेव्हा त्याचे हात त्याच्या तोंडात घालते तेव्हा जमीनीवरील कृमींची अंडी तिच्या पोटात जाणार नाहीत.

तुमच्या बाळाला कृमींचा संसर्ग झाला असेल, तर तुम्हाला कदाचित ते लक्षातही येणार नाही. कृमीनाशक औषधांमुळे तुमच्या बाळाच्या पोटात काही कृमी गेले असल्यास ते मारले जातील. तुमच्या बाळाच्या पोटात कृमी नसले तरीही तुमच्या बाळासाठी ते घेणे सुरक्षित आहे. तुमचे बाळ १ वर्षाचे झाल्यानंतर तिला दर ६ महिन्यांनी कृमीनाशक औषध द्या.

मागील महिना