तुमचे नवजात बाळ
तुमच्या बाळासाठी एक संपूर्ण नवे जग
तुमच्या बाळासाठी हे मोठे, गोंगाट असलेले जग नवीन आहे! बाळाला याची सवय होईपर्यंत ते थोडेसे चुळबुळ करेल. हळूहळू, त्याच्या हालचाली सहज होतील.तुम्हाला कदाचित बाळाला पुरेसे दूध मिळत नसल्याची काळजी वाटू शकते. तुमचे बाळ दर २ ते ३ तासांनी किंवा दिवसातून ८ वेळा दूध पित असेल तर ते पुरेसे आहे. याची खात्री करण्यासाठी त्याच्या मलाचा रंग तपासावा. सुरुवातीला तो काळा असतो व ४थ्या दिवसापर्यंत तो पिवळा होतो.
तुमचे बाळ स्तनाग्रे चोखू शकते, पकडू शकते, शोधू शकते व डोळे मिचकावू शकते. ते कदाचित काही वेळा थेट तुमच्या डोळ्यात पाहील. तुम्हीही थेट त्याच्या डोळ्यात पाहून, हसून व होकार देऊन प्रतिसाद द्यावा. ते लवकर शिकते आहे!
जवळपास दोन आठवड्यात तुमचे बाळ पोटावर पडून राहिलेले असताना डोके उचलण्याचा प्रयत्न करत आहे का हे पाहा. ते कदाचित त्याचे डोके एका बाजूकडून दुसरीकडे वळवू शकेल. यामुळे त्याच्या मानेचे स्नायू विकसित व्हायला मदत होते.
बाळ १ महिन्याचे होईपर्यंत त्याचे सुरुवातीचे थरथरणे व घाबरणे कमी होऊ लागते. ते दिवसेंदिवस अधिक सशक्त होत असते व त्याच्या आजूबाजूच्या जगाविषयी शिकत असते.
त्याच्यातील आणखी एक लक्ष वेधून घेणारा बदल म्हणजे आता ते वेगवेगळे आवाज काढू लागते. ते तुमच्याशी त्याच्या पद्धतीने बोलायचा प्रयत्न करते! तुम्हीही तुमच्या बाळासारखेच आवाज काढण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्याला खाली ठेवून इतरत्र गेलात तरी त्याच्याशी बोलत राहा.
तुमच्या नवजात बाळाला जवळ घ्या!
तुमच्या बाळाचा एकदा जन्म झाल्यानंतर, तुमचे शरीर प्रसूतीनंतरचे काही घटक बाहेर टाकते, त्याला वार असे म्हणतात. तुम्हाला पुन्हा कळ आल्यासारखे वाटेल, मात्र यावेळी ती क्षीण असेल.तुमच्या नवजात बाळाला तुमच्या शरीराशी चिकटून धरा. ते चोखण्यासाठी तुमचे स्तन शोधेल. त्याला शक्य तितक्या लवकर तुमचे स्तन द्या. अशा प्रकारच्या स्तनपानामुळे जोर देऊन वार अधिक सहजपणे बाहेर काढण्यासाठी तुमच्या कळा वाढतील.
वार व गर्भजलाची मोकळी पिशवी, तुमच्या गर्भाशयाच्या तळाशी पडेल. ते तुमच्या योनीद्वारे बाहेर टाकले जाते.
तुमच्या बाळाला तुमच्या जवळ धरुन ठेवा. त्याला तुमच्या शरीराशी चिकटून धरल्याने त्याला ऊब मिळेल, त्याला स्तनपान करता येईल व तुमचा रक्तस्राव कमी व्हायला मदत होईल.
प्रसूतीनंतर पुरेशी विश्रांती घेण्यासाठी व तुमच्या बाळाला जाणून घेण्यासाठी वेळ द्या. रक्तस्राव शोषून घेण्यासाठी तुम्हाला काही पॅड किंवा स्वच्छ कापडाच्या घड्या लागतील. सुरुवातीला तो फार अधिक, पाळीत खूप रक्तस्राव होतो त्याप्रमाणे असेल. हळूहळू तो व्यवस्थित होईल व बराच कमी होईल. तुमच्या बाळाच्या जन्मानंतर रक्तस्राव सुरु राहू शकतो.
माझ्या बाळाला ऊबदार कसे ठेवू?
तुमच्या बाळाचा जन्म होताच त्याला ऊबदार ठेवणे अतिशय आवश्यक आहे. बाळांना गर्भाशयाच्या बाहेरच्या नवीन, थंड, तापमानाशी जुळवून घेता येत नाही व त्यांची ऊब लगेच जाते.तुमच्या बाळाचा जन्म झाल्यानंतर ते ओले असेल, त्याला व्यवस्थित कोरडे करा.
त्याला किमान पहिले ६ तास आंघोळ घालायची गरज नाही. तुमच्या बाळाच्या पहिल्या ६ तासात, केवळ नाळ स्वच्छ करा. तुमच्या बाळाच्या इतर अवयवांना अंघोळ घालायची गरज नाही. तुमच्या बाळाला इतक्या लवकर आंघोळ घातल्याने ते आजारी पडू शकते व त्याला थंडी वाजू शकते.
तुमच्या परिचारिकेला तुमच्या बाळाला तुमच्या उघड्या छातीवर ठेवायला सांगा. तुमची ऊब मिळाल्याने त्याला फार थंडी वाजणार नाही. त्याला व्यवस्थित धरुन ठेवा म्हणजे ते घसरुन पडणार नाही.
तुमच्या दोघांवर स्वच्छ, उबदार कांबळे ओढून घ्या. यामुळे ऊब आत राहील. तुम्ही त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी झोळी तयार करु शकता. त्याचे डोके टोपऱ्याने किंवा एखाद्या कापडाने झाकून घ्या. बाळांची बरीच उष्णता त्यांच्या डोक्यावाटेही निघून जाते.
तुमच्या बाळाला तुमच्या जवळ धरुन ऊब दिल्याने तुम्हाला व तुमच्या बाळाला एकमेकांना जाणून घ्यायला वेळही मिळेल. तुम्हाला इतके दिवस कोण लाथा मारत होते हे आता तुम्ही पाहू शकाल! तुमच्या बाळाला अशा प्रकारे धरल्यामुळे तुमचे बाळ सहजपणे स्तनांपर्यंत पोहोचू शकते व दूध प्यायला सुरुवात करु शकते.
त्याला केवळ स्तनपानच हवे असते
तुम्हाला तुमच्या बाळाला पाजता यावे म्हणूनच तुम्हाला स्तन देण्यात आले आहेत!तुमच्या बाळाला पहिले ६ महिने सुदृढ राहण्यासाठी केवळ तुमच्या स्तनांचे दूध हवे असते. त्याला ६ महिन्यांपूर्वी घन आहाराची गरज नसते. त्याला इतर कोणत्याही प्रकारच्या दुधाची गरज नसते. त्याला पाणी किंवा इतर पेयांची गरज नसते.
तुमच्या स्तनांचे दूध विशेष असते. बाळ वाढत जाते तसे ते बदलत जाते.
तुमचे सुरुवातीचे दूध दाट असते व त्यामध्ये तुमच्या बाळाला संसर्गांना प्रतिबंध करण्यासाठी भरपूर जीवनसत्त्वेव पोषकद्रव्ये असतात. यामुळे ते निरोगी राहते.
त्यानंतर तुमचे दूध पांढरे व कमी दाट होते. यामुळे बाळाची तहानही भागते त्यामुळे, हवामान उष्ण असले तरीही तिला पाण्याची गरज नसते. तुमच्या बाळाच्या गरजा भागविण्यासाठी तुमचे दूधही बदलत असते.
जेवढे तुमचे बाळ अधिक दूध पिते तेवढे तुम्ही अधिक दूध तयार करता. तुमचे स्तन लहान असले तरीही तुमचे शरीर तुमच्या बाळासाठी पुरेसे दूध तयार करु शकते. तुम्ही तुमच्या लहानशा नवजात बाळासाठी ते तुमचे बाळ ६ महिन्यांचे होईपर्यंत योग्य प्रमाणात दूध तयार करु शकता.
तुमच्या स्तनांचे दूध तुमच्या बाळाला तिच्या पोटातील, फुफ्फुसातील, मूत्राशयातील, त्वचेवरील व कानांमधील जंतूंचा प्रतिकार करायला मदत करते. जी बाळे पहिल्या वर्षी केवळ स्तनपान घेतात ती इतर दूध पिणाऱ्या मुलांपेक्षा कमी आजारी पडतात.
तुम्हाला पुन्हा कामावर जायचे असेल तर तुम्ही तुमच्या स्तनांचे दूध पिळून काढू शकता व दुसरे कुणीतरी ते तुमच्या बाळाला पाजू शकते. तुमच्या बाळाची देखभाल करणाऱ्या व्यक्तिला तुमच्या स्तनांचे दूध बोंडल्यातून किंवा वाटी आणि चमच्याने तुमच्या बाळाला कसे भरवायचे ते सांगा. तुमच्या स्तनांमधून दूध काढल्यानंतर ते ६ तासांपर्यंत व्यवस्थित राहते.
६ महिन्यांनंतर, तुमच्या वाढत्या बाळाला स्तनांच्या दूधापेक्षाही आणखी हवे असते. मात्र तेघन आहार खायला शिकेपर्यंत व २ वर्षांचे होईपर्यंत तुमच्या स्तनांचे दूध देणे महत्वाचे आहे.
स्तनपान – कशी सुरुवात करायची?
सर्वप्रथम एक पेलाभर स्वच्छ, सुरक्षित पाणी प्या, व तुमच्या हाताशी ते ठेवा. स्तनपान देताना तुम्हाला तहान लागू शकते.त्यानंतर बसण्यासाठी आरामशीर जागा शोधा, जिथे तुम्ही तुमचे हात व पाठ दुखणार नाही अशा स्थितीत बाळाला घेऊन बसू शकता. तुमच्या पाठीला आधार असल्याची व तुम्हाला पुढे वाकावे लागत नसल्याची खात्री करुन घ्या.
तुम्हाला व तुमच्या बाळाला आधार देण्यासाठी काही उशा किंवा कांबळे घ्या. वेगवेगळ्या स्थितीत बसून पहा. बऱ्याच मातांना बाळाला खालून गादी किंवा उशी लावून थोडे उंच करुन पाळण्यासारखे छातीला लावल्याने व्यवस्थित पाजता येते असे वाटते. किंवा बाळाला तुमच्या बाळाला तुमच्या हाताखाली घ्या म्हणजे त्याची पावले मागच्या दिशेने व त्याचे डोके तुमच्या स्तनांपाशी असेल. तुमच्यासाठी जे अधिक आरामशीर आहे ते करा.
तुम्ही दोघेही जेव्हा आरामशीर स्थितीत बसलेले असाल तेव्हा तुमचे स्तन तुमच्या बाळाच्या तोंडात द्या व स्तनपानाला सुरुवात करा.
तुम्हाला बाळाला दूध पिण्यासाठी ५ ते ४० मिनिटे लागू शकतात. तुम्हाला आवाजामुळे त्रास होत असेल तर एखादे शांत ठिकाण शोधा. तुम्हाला कंटाळा आला असेल तर रेडिओ किंवा टीव्ही लावून पाजण्याचा प्रयत्न करा किंवा मैत्रिणीसोबत किंवा नातेवाईकांसोबत बसा
पुढील महिना
Post a Comment