बाळ: ३ महिन्यांचे

तुमच्या बाळाला खेळायला आवडते

तुमचे बाळ अधिक लवचिक होत आहे. त्याला कदाचित बोटांची उघडझाप करायला, किंवा हातांनी टाळी वाजवायला मजा वाटेल.

तुमच्या बाळाची विनोद बुद्धीही विकसित होत आहे. त्याच्या पोटावर गुदगुल्या केल्या किंवा मोठा आवाज करुन मुका घेतला तर ते कदाचित खुदकन हसेल. 

तुमच्या बाळाला जन्मापासूनच स्पर्श आवडतो. त्याच्या वाढीसाठी व विकासासाठी तो आवश्यक आहे. आंघोळीनंतर चोळणे किंवा झोपण्यापूर्वी त्याला कुशीत घेतल्याने तुम्हाला दोघांनाही बरे वाटेल.

केवळ खेळल्यानेही तुमच्या बाळाचा मेंदू विकसित व्हायला मदत होते. त्याचा मेंदू विकसित होतो, तसे ते अधिक चौकस होते. ते कदाचित त्याला पकडता व हलवता येईल अशा खेळण्याशी खेळू शकते. ते रंग, रुप व आकारही शिकेल. खेळण्याचा आवाज व ते मऊ आहे किंवा कडक आहे यातूनही ते शिकते. 

तुम्ही मजेशीर चेहरे केल्यानंतर तुमचे बाळ खुदुखुदू हसायला व स्मित हास्य करायला शिकेल व आता वेगवेगळ्या गमतीजमती त्याला आवडायला लागतील. त्याला आता भरपूर वेगवेगळे आवाज ऐकायलाही मजा वाटेल. तुमच्या जिभेने क्लिक असा आवाज करा, शिट्टी वाजवा किंवा प्राण्यांचे आवाज काढा. त्याला ते फार आवडेल.

माझ्या बाळाची वाढ व्यवस्थित होत आहे का?

ज्या बाळाची वाढ व्यवस्थित होतेय ते चुणचुणीत, भरपूर उत्साही असेल व त्याला खेळावेसे वाटेल.

ते थेट तुमच्याकडे पाहते का? ते तुमच्याकडे पाहून हसेलही! म्हणजे त्याला व्यवस्थित दिसत आहे हे तुम्हाला समजेल.

तुम्ही त्याला उचलता तेव्हा ते किती जड झाला आहे हे तुम्ही पाहिले आहे का? हे ते व्यवस्थित स्तनपान घेत असल्याचे दाखवते.

ते नवीन आवाजाच्या दिशेला वळतो का? याचा अर्थ ते व्यवस्थित ऐकतेय .

तुमचे बाळ झोपाळू, थकलेले असेल व त्याला खेळावेसे वाटत नसेल, तर तुम्ही काही समस्या आहे का हे पाहण्यासाठी त्याला आरोग्य सेविकेकडे घेऊन जाणे महत्वाचे आहे.

तुमचे बाळ आजारी असेल किंवा तुम्हाला त्याची काळजी वाटत असेल, तर दर महिन्याला एका दोऱ्याने दंड मोजून पाहा. दोरीवर खूण करा, म्हणजे पुढील वेळी तुम्ही त्याला मोजल्यानंतर तो किती वाढला आहे हे तुम्हाला समजेल. त्याच्या दंड मोठा झाला असेल तर तो वाढतोय. त्याचा दंड तेवढाच राहिला किंवा तो आणखी लहान झाला तर, तर त्याला आणखी अन्न आवश्यक आहे.

तुमच्या आरोग्य सेविकेकडून नियमितपणे तपासणी करुन घेतल्याने तुम्हाला तुमच्या बाळाची वाढ व्यवस्थित होत असल्याची खात्री करुन घेता येईल. त्याचे दर काही महिन्यांनी वजन करुन घ्यायचा प्रयत्न करा. तुम्ही तिथे असताना तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही ते आरोग्य सेविकेला विचारु शकता. तुमचे सर्व प्रश्न १ भेटीतच विचारायचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा वेळ वाचेल.

ते कधी पालथे पडू लागेल?

पालथे पडणे म्हणजे तुमचे बाळ पाठीवर पडलेले असताना वळून पोटावर, किंवा पोटावरुन वळून पाठीवर पडू शकेल.

ते साधारण ६ ते ७ महिन्यांचे असताना, त्याची मान व हाताचे स्नायू पुरेसे बळकट झाल्यानंतर पालथे पडू लागेल.

तुम्ही तुमचे बाळ ३ महिन्यांचे असताना त्याला पोटावर ठेवल्यास , ते कदाचित त्याच्या दंडांचा वापर करुन डोके व खांदे जमीनवरुन उचलू शकेल. यामुळे ते पालथे पडण्यासाठी तयार होईल.

तुम्ही तुमच्या बाळासोबत खेळून त्याला प्रोत्साहन देऊ शकता. त्याला त्याच्या पोटावर ठेवा व त्याच्या एका बाजूला खेळणे हलवा. त्याला खेळण्याच्या दिशेने वळता आले तर, हसा व म्हणा "शाब्बास!"

तुमचे बाळ पहिल्यांदा कधी पालथे पडेल हे तुम्ही सांगू शकत नाही. ते सुरक्षित राहावे यासाठी त्याला पलंगावर किंवा ते पडेल व त्याला लागेल अशा ठिकाणी एकटे सोडू नका.

तुमचे बाळ ७ महिन्यांचे झाल्यानंतरही पालथे पडत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांशी बोलू शकता. मात्र फार जास्त काळजी करु नका: बाळांची कौशल्ये वेगवेगळ्या प्रकारे विकसित होत असतात, आणि काही बाळांची इतरांपेक्षा वेगाने होतात.

माझे बाळ आता वस्तू हातात धरु शकते!

तुमच्या बाळाला वस्तुंसोबत खेळायला मजा येते, व त्यामुळे त्याच्या मानसिक व शारीरिक कौशल्यांचा विकास व्हायला मदत होते.

तुमचे बाळ जेव्हा वस्तू धरायला शिकते तेव्हा त्याच्यासाठी खेळाचे एक नवीन जगच उलगडते. तुमच्या बाळाने खाणे, दात घासणे, वाचणे, लिहीणे व विविध कामे करणे यासारख्या गोष्टी स्वतः करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे.

तुमच्या बाळाची जन्मापासूनच वस्तू पकडण्याची तीव्र प्रवृत्ती आहे. सुरुवातीला, त्याला केवळ मनोरंजक वस्तुंकडे पाहूनच आनंद होतो, मात्र लवकरच त्याला त्या हातात धराव्याशा वाटतात. ते ३ महिन्यांची झाल्यापासून हे कौशल्य वापरु लागते. तुमच्या बाळाला हे कौशल्य शिकण्यास मदत व्हावी म्हणून रंगीबेरंगी वस्तू चांगल्या असतात. तुमच्या बाळाला पकडता येईल एवढ्या अंतरावर एखादी वस्तू हलवून तुमच्या बाळाशी खेळा. ते ती पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे का ते पहा!

अशा प्रयत्नांसाठी वेगवेगळा पोत असलेल्या वस्तू व खेळणी वापरणे उत्तम. मऊ ते कडक अशा विविध प्रकारच्या वस्तुंमुळे तुमच्या बाळाची ज्ञानेंद्रिये उत्तेजित व्हायला मदत होते. तिला खेळण्यासाठी मऊ साहित्यापासून बनविलेल्या सुरक्षित वस्तू द्या.

तुमचे बाळ साधारण ५ महिन्यांचे होईपर्यंत, ती वस्तू तोंडात घालून त्याविषयी जाणून घ्यायला सुरुवात करते. हे नैसर्गिक आहे, व त्यामुळे तुमच्या बाळाला शिकायला मदत होते.

तुमच्या बाळाला तोंडात घालण्यासाठी सुरक्षित वस्तू किंवा खेळणी निवडा. ती स्वच्छ करण्यास सोपी असली पाहिजेत, त्याला कुठेही टोकदार कडा, दोरे, किंवा लहान भाग नकोत. ती वारंवार स्वच्छ करा.

मागील महिना 

पुढील महिना