-->

बाळ: ९ महिन्यांचे







तुमचे बाळ तुमची नक्कल करु शकते

तुमच्या बाळाला वातावरणाची सवय झालेली असते व त्याला सवयीच्या गोष्टी आवडतात. या वयात, ते कदाचित तुम्हाला चिकटून बसेल व त्याचे लक्ष दुसरीकडे वळवावे लागेल. त्याला स्वतःचे पांघरुण किंवा आवडते खेळणे सोबत ठेवता आले तर कदाचित शांत वाटेल, म्हणजे ते कधीही बाहेर गेले तरीही त्याला घराची आठवण सोबत नेता येईल. गोंगाट व अनोळखी लोकांपासून लांब थोडा वेळ शांत बसल्यास त्याला जुळवून घ्यायला मदत होईल.

आता, तुमच्या बाळाला त्याची खेळणी कुठे ठेवली आहेत यासारख्या गोष्टी आठवतात. त्याने दोन आठवड्यांपूर्वी पाहिलेल्या कृतींचीही ते नक्कल करु शकते. मात्र अजूनही त्याला सगळे काही आठवत नाही. तुमचे बाळ दोन किंवा तीन वर्षांचे होईपर्यंत त्याची दीर्घकाळ टिकणारी स्मरणशक्ती विकसित होत नाही.

तुमच्या बाळाचे बडबडणे आता बरेचसे खऱ्या शब्दांप्रमाणे वाटू लागेल. तुमच्या बाळाला असे वाटेल की ते काहीतरी बोलते आहे, म्हणूनच ते खरोखर बोलत असल्याप्रमाणे त्याला उत्तर द्या! तुम्ही जेव्हा त्याच्याशी बोलता व त्याच्याकडे पाहता तेव्हा ते तुमच्याकडून संभाषणाविषयी व चेहऱ्यावरील हावभावांविषयी शिकेल.

तुमच्या बाळाला अजूनही तुमच्या प्रत्यक्ष शब्दांपेक्षा तुमच्या आवाजातल्या चढउतारातून समजते. त्याने तुम्हाला कधी खुश केले आहे हे त्याला समजेल, म्हणून त्याचे भरपूर कौतुक करा.


तुमच्या बाळाचे व्यक्तिमत्व आता प्रकर्षाने जाणवू लागेल. ते कदाचित सर्वांमध्ये मिसळणारे व सगळ्यांना भेटल्यावर हसणारे असेल, किंवा ते लाजाळू व आपला चेहरा लपवणारे असेल. तुमच्या बाळाला आता तुमचे लक्ष कसे वेधून घ्यायचे हे समजते व त्याने तुम्हाला दरवाजाकडे जाताना पाहिल्यावर ते कदाचित तुम्हाला अच्छा करेल.





माझ्या बाळाला अतिसार आहे

तुमच्या बाळाला अतिसार असेल, तर त्याच्याशरीरातून गेलेले द्रवपदार्थ त्याला परत मिळणे आवश्यक आहे, नाहीतर तर त्याच्या शरीरातील पाणी कमी होईल. याचा अर्थ असा होतो की त्याच्या शरीरामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेले पाणी पुरेसे नाही. त्याला स्तनपान करत रहा व त्याला जितके वेळा प्यायचे आहे तितके वेळा पिऊ द्या.

ते सहा महिन्यांपेक्षा लहान असल्यास, त्याला पाण्याची गरज नाही. त्याला जे काही हवे आहे ते स्तनांच्या दूधातून मिळेल. मात्र त्याला अधिक वेळा स्तनपान करा. त्याच्या अंगी कदाचित पोटभर दूध पिण्याइतकी ताकद नसेल त्यामुळे त्याला कदाचित वारंवार पाजावे लागेल.

ते ६ महिन्यांपेक्षा मोठी असल्यास, त्याला स्तनपानांच्या दरम्यान स्वच्छ, सुरक्षित पाण्याचे (उकळलेल्या व थंड केलेल्या) लहान लहान घोट प्यायला द्या. तुम्हाला शक्य असल्यास, त्याला ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ओआरएस) घोट, तासाभरात काही वेळा देण्याचा प्रयत्न करा. ओआरएसची पूड लिटरभर स्वच्छ, उकळलेल्या व थंड केलेल्या पाण्यात विरघळवली जाते. तुम्ही ती तयार करुन ८-१२ तासात वापरु शकता. तुमच्या बाळाला प्रत्येक वेळा पातळ शी झाल्यानंतर १५-२० लहान चमचे ओआरएस पाजा. अशाप्रकारे लहान लहान चमचे ओआरएस अर्ध्या अर्ध्या तासाने देता येईल. तुमचे बाळ ओआरएस पित नसेल, तर तुम्ही लिंबाचा रस, मीठ व साखर घालून, डाळ किंवा भाताचे पाणी, नारळाचे पाणी किंवा मीठ घालून लस्सी देऊ शकता.

त्याला फळांचा रस, कोला किंवा गोड पेये देऊ नका. या पेयांमुळे अतिसार आणखी वाढू शकतो.

तुमच्या बाळाला शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडे घेऊन जा जर:
  • त्याला १ दिवसाहून अधिक काळ अतिसार असेल
  • त्याची त्वचा किंवा ओठ कोरेडे पडले असतील
  • त्याला गडद पिवळ्या रंगाची लघवी होत असेल व त्याला कमी वेळा लघवी होत असेल
  • त्याच्या डोक्यावरील मऊ भाग (टाळू) खोल गेली असेल
  • ते पित नसेल, त्याच्या शीमध्ये रक्त असेल किंवा त्याचे पोट फुगले असेल
  • त्याला एका दिवसापेक्षाही अधिक काळ उलट्या होत असतील, किंवा त्याला एका दिवसापेक्षा अधिक काळ ताप आहे



Post a Comment

© आरोग्य . All Rights Reserved