-->

बाळ: १ महिन्याचे



आई, तुझ्या बाळाच्या डोळ्यांमध्ये बघ!

तुमचे बाळ, आता एखाद्या वस्तूवर दोन्ही डोळे केंद्रित करायला शिकेल. तुम्ही त्याच्यासमोर एखादे खेळणे हलवले तर ते पाहील. मात्र, ते दिसेनासे झाल्यानंतर, तुमचे बाळ त्याविषयी विसरुन जाईल!

तुमच्या बाळाची स्मरणशक्ती हळूहळू चांगली होत जाते. ते खेळणे विसरेल, मात्र ते नेहमी तुमचा आवाज ओळखेल, व तुमच्या गर्भाशयात असल्यापासून तुमचा आवाज त्याच्या लक्षात आहे.

तुमच्या बाळाला आंघोळ घालतांना तुम्हाला दोघांनाही खूप मजा येऊ शकते. एक स्वच्छ टॉवेल घ्या व भरपूर स्वच्छ, सुरक्षित पाण्याने त्याला आंघोळ घाला. पाणी कोमट असेल मात्र गरम नसेल याची खात्री करा. बहुतेक बाळांना आंघोळीमुळे आराम मिळतो व त्यांना पाणी आवडते. त्यांना कदाचित त्यामुळे तुमच्या पोटात असतानाचीही आठवण येऊ शकते. ते पाण्यात असताना त्याला कधीही एकटे सोडू नका.

तुमच्या बाळाच्या चेहऱ्याकडे पहा आणि डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न करा. यामुळे त्याला सामाजिक कौशल्ये शिकायला मदत होते. लवकरच तुमचे बाळ तुमचा चेहरा ओळखू लागेल. ते कदाचित इतर लोकांपेक्षा तुम्हाला अधिक प्राधान्य देईल. ते तुम्हाला पाहिल्यावर कदाचित वेगवेगळे आवाज काढेल व आनंदाने लाथा मारेल. तुम्हाला लवकरच ते पहिल्यांदा हसताना दिसेल!

तुमचे बाळ लवकरच आजूबाजूला लक्ष देऊ लागेल. त्याचे वेगवेगळ्या आवाजांकडे लक्ष जाईल व त्याला रंगीबेरंगी आकार आवडू लागतील.

आता तुमचे बाळ पोटावर पडलेले असताना डोके व छाती उचलू शकेल. त्याच्यासाठी डोके स्थिर ठेवायला (मान धरायला) शिकणे एक महत्वाचा टप्पा आहे.

तुमचे बाळ आता दररोज तुमचे अधिक ऐकू सुद्धा लागते. तुम्ही बोलताना, ते कदाचित जे काही करत आहे ते थांबवून तुमचे बोलणे ऐकेल. त्याच्याशी बोलत राहा, त्याच्यासारखे आवाज काढा. तुमच्या बाळाशी बोलल्याने त्याला बरे वाटेल व तुमच्याशी बोलायला प्रोत्साहन मिळेल.


त्याला पुरेसे दूध मिळत आहे का?

तुमचे बाळ दिवसातून किमान ६ ते ८ वेळा दूध पित असेल, तुम्ही आरामात तिला पाजू शकत असाल, तर त्याला बहुतेक पुरेसे दूध मिळत आहे. ते दूध पित असताना गिळत असल्याचे तुम्हाला दिसू शकेल व दूध पाजल्यानंतर तुम्हाला तुमचे स्तन रिकामे व मऊ वाटतील.

आणखी एक चांगली खूण म्हणजे तुमचे बाळ चोखताना ताल बदलत असेल व पितांना थांबत असेल. ते तयार झाल्यावर, त्याने पुन्हा प्यायला सुरुवात केली पाहिजे व त्याला हवे असेल तेव्हा तुमच्या स्तनांपासून दूर होता आले पाहिजे.

तुमच्या बाळाच्या लंगोटावरुनही तुमच्या बाळाला पुरेसे दूध मिळत आहे का हे दिसते. त्याची शी पिवळ्या रंगाची असली पाहिजे व ते कदाचित शी वारंवार करेल. ते मोठे झाल्यानंतर, कदाचित आठवड्यातून एकदाच शी करेल. ते दर तीन दिवसांनी शी करत असेल किंवा केवळ आठवड्यातून एकदाच करत असेल तरी ते व्यवस्थित आहे. त्याला बद्धकोष्ठतेसाठी काहीही वनौषधींचे उपाय किंवा अतिरिक्त पाणी द्यायची गरज नाही.

तुम्ही त्याचा लंगोट बदलता तेव्हा त्याला होणारी लघवी पांढरट असली पाहिजे व त्याला वास येत नसावा. त्याने दिवसभरात किमान ६ ते ८ लंगोट ओले केले पाहिजेत. तुम्हाला बाळाच्या लंगोटावर नारंगी किंवा विटकरी रंगाचे डाग दिसले तर, काळजी करु नका. उष्ण व दमट वातावरणात असे काही वेळा होऊ शकते. तुमच्या बाळाला जितके वेळा दूध प्यायचे आहे तितके वेळा त्यालादूध देत रहा.

ज्या बाळाला पुरेसे दूध मिळते, त्याची त्वचाही घट्ट, तुकतुकीत, तजेलदार रंगाची असते जी हळूच गालगुच्चा घेतल्यावर पुन्हा घट्ट, तुकतुकीत होते.

तुमच्या बाळाला पुरेसे दूध मिळत नसल्याची तुम्हाला काळजी वाटत असेल, तर एखाद्या आरोग्य सेविकेला विचारा. तुमचे बाळ निरोगी आहे का हे ती तपासू शकतील.

आता जास्त जेवा!

स्तनपान दिल्यामुळे तुम्हाला अतिशय भूक लागू शकते! तुम्ही नेहमीपेक्षा अधिक खाल्ले पाहिजे. तुमचे शरीर अतिशय चांगल्या प्रकारे दूध तयार करु शकते, मात्र तुम्ही पुरेसे खाल्ले नाही तर तुम्हाला थकल्यासारखे व क्षीण वाटू शकेल.

हिरव्या पालेभाज्या, आंबा, संत्री, केळी यासारखी भरपूर ताजी फळे व भाज्या खा. विविध रंगाचे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला भरपूर जीवनसत्त्वे व खनिजे मिळतील. भात, बटाटा, पोळी, दलिया व धान्ये यासारखे ऊर्जा देणारे अन्न खा. प्रथिने खा, जी अंडी, पनीर, डाळ, मासे, चिकन व मटण यामध्ये सापडतात. दूध, नारळाचे दूध, दही व कठीण कवचाची फळे व दाणे दररोज खाण्याचा प्रयत्न करा. विविध प्रकारचे खा, म्हणजे तुमच्या शरीराला तुमच्या बाळाचे व्यवस्थित पोषण करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही मिळेल.

नियमित वेळी ३ वेळा जेवण्याचा प्रयत्न करा. दिवसभर भरपूर अल्पोपहार घेत रहा, म्हणजे तुमची ऊर्जा टिकून राहील. चांगला अल्पोपहार म्हणजे सुका मेवा, कठीण कवचाची फळे, ताजी फळे व भाज्या व व दाणे. तुम्ही स्तनपान देत असताना तुमच्या लोह व कॅल्शियमच्या गोळ्या घेत राहा.

स्तनपान दिल्यामुळे तुम्हाला तहान लागू शकते. तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान देण्यापूर्वी पेय घ्या. स्वच्छ, सुरक्षित पाणी चांगले. दूध तयार करण्यासाठी तुम्ही दूध प्यायला पाहिजे असे नाही, तुम्ही भरपूर स्वच्छ, सुरक्षित पाणी प्यायले पाहिजे. फार अधिक चहा, कॉफी, कोला किंवा सोडामिश्रित पेये पिऊ नका. ती दिवसातून १ किंवा २ पेले घेतलीत तरी पुरेसे आहे.

तुम्हाला खावेसे वाटत नसेल तर तुम्हाला आणखी मदतीची गरज असल्याचे हे लक्षण असू शकते. तुम्हाला खाणे अतिशय त्रासदायक वाटत असेल व तुम्ही स्वतःवर बळजबरी करत असाल तर तुमच्या आरोग्य सेविकेशी बोला.

जन्मानंतरच्या तपासण्या

तुमच्या बाळाच्या जन्मानंतरच्या आठवड्यांमध्ये तुमची व तुमच्या बाळाची तब्येत व्यवस्थित असल्याची खात्री करण्यासाठी तब्येत तपासून घेणे चांगले असते व त्यामुळे खात्री पटते.

तुमच्या बाळासह डॉक्टरांकडे १ल्या आठवड्यात किमान एकदा व त्यानंतर ते ६ आठवड्यांचे झाल्यानंतर जाऊन या.

तुमच्या बाळाला लगेच बालरोग तज्ञांकडे घेऊन जा जर:
  • त्याचे पोट फार थंड किंवा फार गरम वाटत असेल
  • त्याचे डोळे, हात व पाय जन्मल्यानंतर पहिल्या काही दिवसात पिवळे पडले
  • ते स्तनपान घेत नसेल किंवा व्यवस्थित चोखत नसेल
  • ते सारखी रडत असेल व त्याच्या रडण्याचा आवाज विचित्र वाटत असेल
  • त्याला आकडी आली, ते गुंगी आल्यासारखी वाटत असेल व फारशी हालचाल करत नसेल, किंवा त्याची त्वचा किंवा नखे निळसर वाटत असतील
  • त्याच्या छातीत घरघर होत असेल, गुरगुरत असेल किंवा वेगाने श्वास घेत असेल
  • त्याला एखाद्या दिवसापेक्षा अधिक काळ प्रत्येक वेळी दूध प्यायल्यानंतर उलटी होत असेल किंवा पोट सुजले असेल
  • तुमच्या बाळाच्या नाळेच्या खुंटाभोवतालचा भाग लाल आहे किंवा दुर्गंधीयुक्त आहे

तुमचे बाळ आजारी आहे, व त्याला झटपट उपचारांची गरज असल्याची ही लक्षणे आहेत.

लक्षात ठेवा, मुलांची व मुलींची सारख्याच प्रमाणात तपासणी करणे आवश्यक असते.


माझे बाळ का रडते?

सर्व बाळे रडतात. याद्वारे ती आपल्याला त्यांना काय हवे आहे हे सांगतात, किंवा आपल्याशी संवाद साधतात. काही इतरांपेक्षा जास्त रडतात.

तुमच्या बाळाला कदाचित भूक लागली असेल म्हणून ते रडत असेल. म्हणूनच ते रडू लागले तर त्याला जितका वेळ दूध प्यायचे आहे तितका वेळ पिऊ दे. त्याचे पोट भरल्यावर ते लवकरच शांत होईल.

काही बाळे अस्वस्थ वाटू लागताच रडायला लागतात. तुमच्या बाळाचे कपडे फार घट्ट आहेत का, किंवा त्याचा लंगोट ओला किंवा घाण झाला आहे का हे तपासा.

त्याला कदाचित फार उकडत असेल किंवा फार थंडी वाटत असेल. त्याच्यावर कपड्यांचे किती थर आहेत ते तपासा. त्याच्या अंगावर तुमच्यापेक्षा केवळ १ कपड्याचा थर आणखी असला पाहिजे ज्याद्वारे त्याचा ऊब मिळेल.

तुमच्या बाळाला कदाचित फक्त आराम करायचा असेल किंवा जवळ घ्यायला हवे असेल.

तुमच्या रडणाऱ्या बाळाला पुढील ३ प्रकारे शांत करता येईल:
  • त्याच्याभोवती कांबळे गुंडाळून घ्या. बाळांना ती गर्भाशयात होती त्याप्रमाणे उबदार व सुरक्षित राहायला आवडते.
  • हाताचा पाळणा करुन त्याला तुमच्या जवळ धरा. तुमच्या हृदयाच्या ठोक्यांमुळे त्याला कदाचित शांत वाटू शकेल.
  • त्याच्यासाठी गाणे म्हणा किंवा त्याला हलकेच जोजवा.

तुमचे बाळ सतत रडत असेल, किंवा त्याचे रडणे एरवीपेक्षा अधिक मोठ्या पट्टीत असेल, तर त्याला तुमच्या डॉक्टरांकडे घेऊन जा.


Post a Comment

© आरोग्य . All Rights Reserved