बाळ: १० महिन्यांचे



w.adsbygoogle || []).push({});






तुमच्या बाळाला शब्द समजतात!

तुमच्या बाळाला सोपे शब्द व लहान वाक्ये समजू लागतात. आता मोठ्यांच्या भाषेत त्याचे शब्द पुन्हा त्याला म्हणून दाखवायचा प्रयत्न करा.

हळूहळू, ते स्वतंत्र व्हायला शिकेल, व तुम्ही त्याला सोडून गेल्यानंतर कमी रडेल. मात्र काही वेळा, सोडून गेल्यावर त्याला वाईट वाटेल व रडू येईल! त्याच्याकडे तुमच्यासारखा वास येणारे काही असेल उदाहरणार्थ तुमचे कपडे वगैरे, तर त्याला थोडे शांत व्हायला मदत होईल. 

या वयात, तुमचे बाळ आत्मविश्वासाने बसू शकते व फर्निचरला (लाकडी सामानाला) धरुन चालू शकते. ते काही क्षण कशाचा आधार न घेताही उभे राहू शकते, किंवा तुम्ही त्याचा हात धरला तर काही पावले चालूही शकते.

या वयापर्यंत, तुमचे बाळ संपूर्ण जेवण स्वतः हाताने खायला शिकेल. त्याला कपाने प्यावेसे वाटेल. त्याच्यासाठी ही नवीन गोष्ट आहे, व ती कशी करायची हे त्याला काही महिने शिकावे लागेल!

तुमच्या बाळाला आता सोप्या सूचना लक्षात येतील. अर्थात याचा अर्थ असा नाही की ते नेहमीच ‘नाही’ या शब्दाकडे लक्ष देईल! ‘नाही’ हा शब्द प्रामुख्याने बरोबर व चूक, तसेच सुरक्षित व असुरक्षित यातील फरक समजावण्यासाठी वापरला तर त्याला त्याचा अर्थ अधिक चांगला कळेल.



कोणते घन पदार्थ देणे सर्वोत्तम?

तुमचे बाळ ६ महिन्यांचे झाल्यानंतर, ते आईच्या दुधासोबतच मऊ, कुस्करलेले घरगुती पदार्थ थोडे थोडे खाऊ शकते.

सुरुवातीला केवळ एक चमचाभर पुरेसे आहे. त्याच्या समोर बसा व त्याला तुमच्या स्वच्छ बोटाने किंवा एखाद्या चमच्याने थोडे मऊ अन्न द्या. त्याला ते अन्न त्याच्या जिभेत कसे फिरवायचे व गिळायचे हे समजायला कदाचित थोडा वेळ लागू शकेल. थोडा धीर धरा. ते शिकेल.

त्याला सुरुवातीला दिवसातून एकदा कुस्करलेले अन्न द्या, त्यानंतर दिवसातून दोनदा द्या व त्यानंतर दिवसातून ३ वेळा द्या. कुस्करलेले अन्न देण्यापूर्वी व नंतर त्याला तुमचे दूध द्या.

तो अधिक विश्वासाने खाऊ लागल्यावर, तो अधिक कणीदार पदार्थ खाऊ शकेल. तुम्ही त्याला सूजी (उपमा, खीर किंवा शिरा ), दलिया, साबुदाणा (खीर किंवा खिचडी ), भात व डाळ द्यायला सुरुवात करु शकता, जी व्यवस्थित शिजवलेली असेल, म्हणजे वेगवेगळा पोत असलेले पदार्थ कसे खायचे हे तो शिकू शकेल.

तुमचे बाळ अन्न खाऊ लागल्यावर त्याची शी बदलेल, ती अधिक गडद असेल व तिला वास येईल. हे सामान्य आहे.

तुमचे बाळ जेव्हा आपणहून गोष्टी उचलू लागते, तेव्हा तुम्हाला समजेल की आता त्याला त्याला अधिक पोट भरणारे जेवण द्यायची वेळ आली आहे. त्याला दात येत असतील तर कडक-उकडलेली अंडी, व्यवस्थित हाडे काढून कुस्करलेले मासे किंवा मटण किंवा कुस्करलेले वाटाणे, बटाटे व घेवडा किंवा टोस्ट किंवा रस्क देऊन पहा. तुमच्या बाळाच्या जेवणामध्ये मीठ किंवा मसाले घालू नका.

आता ते इकडे तिकडे फिरु लागले आहे, तुमच्या बाळाने दिवसातून ३ ते ४ वेळा खाल्ले पाहिजे. त्याला जेवणाशिवाय नाश्ताही द्या. त्याचे अन्न मऊ असले पाहिजे, म्हणजे त्याला ते जिभेने कुस्करता येईल व गिळता येईल. ते खात असताना कदाचित त्याच्या घशात अडकेल म्हणून त्याच्यासोबत राहा.

त्याने खाण्यापूर्वी त्याचे हात साबणाने व स्वच्छ पाण्याने धुवा.

तुमचे दूध त्याच्यासाठी अजूनही आरोग्यदायी आहे, म्हणूनच त्याला हवे असेल तेव्हा त्याला स्तनपान द्या.

आता ते मोठे झाले आहे, ते आता स्वच्छ, सुरक्षित पाणी पिऊ शकते, मात्र कोला, चहा, कॉफी किंवा गोड पेये नाही.

मागील महिना

पुढील महिना