बाळ: ६ महिन्यांचे

तुमच्या बाळाला घन आहार द्यायला सुरुवात करा

तुमचे बाळ आता स्तनपानाशिवाय घरगुती पदार्थ खायला सुरु करण्यासाठीही तयार आहे! ते सुरुवातीला अगदी थोडेसेच अन्न खाऊ शकेल: अगदी एक चमचाही पुरेसा होईल. त्याला कुस्करलेले घरगुती पदार्थ आवडतील. त्याच्यासमोर बसून तुमच्या स्वच्छ बोटाने किंवा चमच्याने त्याला काही मऊ पदार्थ द्या. तो पदार्थ जिभेने कसा घ्यायचा व गिळायचा हे समजायला त्याला कदाचित थोडासा वेळ लागेल. थोडा धीर धरा. ते शिकेल.

त्याला सुरुवातीला दिवसातून एकदा कुस्करलेले पदार्थ द्या. त्यानंतर दिवसातून दोनदा व नंतर तीनदा द्या. त्याला कदाचित कुस्करलेले पदार्थ खाण्यापूर्वी व खाल्ल्यानंतर थोडेसे स्तनपान घ्यावेसे वाटेल.

या महिन्यात कदाचित तुमच्या बाळाचा पहिला दात येऊ शकेल. साधारणपणे आधी खालचा दात दिसू लागतो.

ते कदाचित एखादा हात दुसऱ्यापेक्षा अधिक वापरेल. त्यानंतर ते कदाचित त्यात बदल करेल. मात्र तुम्हाला ते दोन किंवा तीन वर्षांचे होईपर्यंत उजव्या हाताने काम करते की डावखुरे आहे हे कळणार नाही. त्याला एखादी लहानशी वस्तू हातात पकडू द्या व एका हातातून दुसऱ्या हातात घेऊ द्या. यामुळे त्याला त्याची कौशल्ये विकसित करायला मदत होईल.

तुमचे बाळ आता कदाचित अधिक सक्रिय होत आहे, व त्याला आता इतर बाळांसोबत खेळायला आवडेल!

तुमच्या बाळाला एखादी विशिष्ट वस्तू किंवा खेळणे आवडते का? आवडत असेल, तर लवकरच त्याला त्याशिवाय कुठेही जायला आवडणार नाही. हे सामान्य आहे, व तुमचे बाळ अधिक स्वतंत्र होऊ लागल्याची खूण आहे, कारण ते दिलासा म्हणून तुमच्याऐवजी ते खेळणे किंवा कापड वापरु शकते.

त्याला बद्धकोष्ठता झाली आहे का?

तुमच्या बाळाच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये, त्याचे शीचे वेळापत्रक व्यवस्थित सुरु होण्यासाठी थोडा वेळ लागेल. कधी त्याला पातळ शी होईल व पुढच्या वेळी घट्ट होईल. सामान्य काय आहे हे तुम्हाला लवकरच कळेल.

तुमचे बाळ केवळ स्तनांचे दूध पित असते तेव्हा शी मऊ असेल व सहजपणे होईल. तिने घन आहार घ्यायला सुरुवात केल्यानंतरच तिला कदाचित बद्धकोष्ठता होऊ शकेल, जेव्हा तिची शी घट्ट असेल व सहजपणे होणार नाही, व नेहमी इतकी वारंवार होणार नाही.

बद्धकोष्ठतेची लक्षणे सहज दिसून येतात. 
  • तुमचे बाळ शी करताना रडत असेल तर ती एक खूण असू शकते. त्याची शी कोरडी व घट्ट असल्याचेही तुम्हाला दिसून येईल. त्याला कदाचित नेहमीपेक्षा कमी वेळा शी होईल, काही वेळा आठवड्यातून केवळ ३ वेळाच होईल.
  • अतिशय दुर्गंधीयुक्त शी व वात ही देखील लक्षणे आहेत. पोट कडक होणे व फुगणे हे देखील आणखी एक लक्षण आहे.

तुम्ही काय करु शकता? तुमचे बाळ ६ महिन्यांपेक्षा लहान असेल व त्याला बद्धकोष्ठता झाल्याचे तुम्हाला वाटत असेल, तर त्याला भरपूर स्तनपान द्या. स्तनांचे दूध सर्वोत्तम आहे. त्याला पाणी, किंवा इतर कोणतेही पेय देऊ नका केवळ स्तनपान द्या.

तुमच्या बाळाने घन आहार घ्यायला सुरुवात केली असेल तर त्याला भरपूर फळे व भाज्या तसेच स्तनांचे दूध व स्वच्छ, सुरक्षित पाणी द्या. यामुळे त्याची शी मऊ व्हायला मदत होईल.

काही वेळा, शीला अतिशय पातळ होणे हे बद्धकोष्ठतेचे लक्षण आहे. पचन यंत्रणेत अडथळा निर्माण करणाऱ्या घट्ट शीच्या बाजूबाजूने पातळ शी पुढे सरकू शकते. तुमच्या बाळाला असे होत आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर डॉक्टरांकडे जा.

माझे बाळ कधी रांगू लागेल?

बसल्यानंतर पुढची पायरी म्हणजे तुमचे बाळ रांगू लागेल. सामान्यपणे ही चालायला सुरुवात करण्याच्या दिशेने झालेली प्रगती असते, अर्थात नेहमी असेच होईल असे नाही.

तुमचे बाळ ६ ते ९ महिन्यांचे असताना रांगायला सुरुवात करु शकते. याचा अर्थ असा की ते १ वर्षाचे होईपर्यंत बहुतेक व्यवस्थित रांगू लागलेले असेल.

मात्र सर्व बाळे रांगत नाहीत. तुमच्या बाळाला हात व गुडघ्याच्या आधाराने रांगण्याऐवजी कदाचित पाठीवर गोल फिरायला आवडते असे तुम्हाला कदाचित दिसेल. किंवा त्याला कदाचित पोटावर झोपून इकडे तिकडे फिरायला आवडेल.

काही बाळे अजिबात रांगत नाहीत. त्याऐवजी, ती सरळ उठण्याचा, उभे राहण्याचा व चालण्याचा प्रयत्न करतात. तुमचे बाळ अधिक सक्रिय होत आहे हे महत्वाचे आहे, ते कसे करते हे नाही.

बाळांचा विकास वेगवेगळ्या प्रकारे होतो. तुमच्या बाळाने अजून रांगायला किंवा इतके तिकडे सरकायला सुरुवात केली नसल्याची तुम्हाला काळजी वाटत असेल, तर आरोग्य सेविकेशी बोला.


मागील महिना

पुढील महिना