बाळ: ८ महिन्यांचे
बाळलीला पाहा!
आता तुमच्या बाळाने रांगायला, किंवा बसायला सुरुवात केली असेल. तुमचे बाळ रांगते झाल्यानंतर, ते धडपडेल व पडेल. हा वाढण्याचाच एक भाग आहे. ते नवनव्या गोष्टी धुंडाळताना पाहण्याचा आनंद घ्या मात्र तुमचे घर शक्य तितके सुरक्षित असेल याची खात्री करा.तुमचे बाळ वस्तू हलवून, आपटून, पाडून व फेकून त्याविषयी शिकत आहे. ते एखाद्या वस्तूचे काय करु शकते हे शिकत आहे.
तुमचे बाळ तुम्ही वापरत असलेल्या वस्तूंमध्ये रस दाखवू लागेल. हळूहळू, ते त्या वस्तू व्यवस्थित वापरु लागेल. तुम्हाला ते कदाचित केस विंचरण्याचा प्रयत्न करताना किंवा कपाने पिताना दिसेल.
तुमच्या बाळाची दृष्टी आता बरीच स्पष्ट झाली आहे. ते आता जवळपास तुमच्याइतकेच स्पष्ट पाहू शकते. ते आता एका खोलीतील व्यक्ति व वस्तू ओळखू शकते. ते खोलीत दुसऱ्या बाजूला असलेले एखादे खेळणे पाहून त्याच्याकडे रांगत जाण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या डोळ्यांचा रंगही जवळपास निश्चित झालेला असतो, अर्थात तुम्हाला त्यात नंतर थोडेसे बदल जाणवू शकतात.
लवकरच, तुमचे बाळ भिंती व लाकडी सामानाला धरुन उभे राहील व खोलीत फिरु लागेल.
माझ्या बाळासोबत जेवणाची वेळ
तुमचे बाळ ६ महिन्यांचे असताना त्याने घन पदार्थ खाणे आवश्यक आहे. मात्र त्याला अजूनही स्तनपानाची गरज असते.ते जसे मोठे होईल तसे, त्याला अधिक अन्न व विविध प्रकारचे पदार्थ आवश्यक असतात. मात्र बाळे खाताना भरपूर त्रास देऊ शकतात, त्यांचा अन्नातील रुची सहजपणे जाऊ शकते.
तुमचे बाळ व्यवस्थित खात असल्याची खात्री करा:
- त्याला भरपूर चविष्ट अन्न द्या. पुरेसा वेळ द्या. तो खात असताना बसा व त्याच्याशी बोला. त्याच्यासाठी खाणे हे नवीन कौशल्य आहे व ते ते शिकत आहे.
- तुमच्या बाळाने खायला नकार दिला, तरी धीर धरा. त्याच्यावर बळजबरी करु नका. त्याला साखर, चिप्स, फरसाण किंवा इतर अनारोग्यकारक पदार्थ देऊ नका. त्यातून काहीही पोषण मिळत नाही, व ते तुमच्या बाळासाठी वाईट आहेत.
- त्याला भरपूर रंग, चवी व पोत द्या. बाळांची जशी वाढ होते तशा, त्यांच्या चवी नेहमी बदलत जातात. तुमच्या बाळाला आता जे अजिबात आवडत नाही, ते त्याला कदाचित काही आठवड्यांमध्ये अतिशय आवडू लागेल!
- जेवणाची वेळ मनोरंजक बनवा. तो आरामदायक असेल व जेवणाच्या वेळी तुम्हाला दोघांनाही मजा येईल याची खात्री करा.
- त्याच्या डोळ्यात पहा, हसा व त्याच्याशी बोला. त्याची जेवणाची वेळ सर्वांमध्ये मिसळण्याची वेळ असू द्या. त्यामुळे त्याला खाता येईल व त्याला सामाजिक कौशल्ये व नवीन शब्दही शिकता येतील.
- तुमच्या बाळाचे खाताना सहजपणे लक्ष विचलित होत असेल तर त्याला निवांत ठिकाणी न्या व खाण्यासाठी प्रेमाने प्रोत्साहन द्या.
माझे बाळ फिरु लागले आहे!
आता तुमचे बाळ चालते फिरते झाले आहे, त्यामुळे त्याला सुरक्षितपणे खेळता येईल याची खात्री करण्याची वेळ आली आहे.तुमच्या बाळाला पाण्याच्या बादल्या किंवा गरम शेगडी किंवा आगीजवळ पोहोचता येणार नाही याची खात्री करा.
कपाटाची दारे बंद करुन ठेवा व खोकी व टोपल्या त्याच्या हाती लागणार नाहीत अशा ठेवा.
ब्लीच व धुण्याच्या पावडरसारख्या स्वच्छ करण्याच्या साहित्याने बाळाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे ते कुलुपात ठेवा.
तुमचे हात व गुडघे टेकवून ओणव्या व्हा म्हणजे तुम्हाला तुमच्या बाळाच्या कोनातून जगाकडे पाहता येईल. हलते दोरखंड किंवा रोपांमुळे त्याला तिथपर्यंत पोहोचावेसे वाटू शकते व वस्तू स्वतःवर खेचून घ्याव्याशा वाटू शकतात.
पर्स, बॅगा व खरेदी केलेल्या वस्तू त्याच्या हाती लागणार नाहीत एवढ्या उंच ठेवा. अगदी लिपस्टिक, सौंदर्य-प्रसाधने यासारख्या नेहमीच्या वस्तुंमुळेही त्याला त्रास होऊ शकतो.
औषधे व गोळ्या हाताशी लागणार नाहीत याची काळजी घ्या.
त्याला शौचालयापासून व घाण कपड्यांपासून दूर ठेवा. तसेच ते पाणी, प्राणी व त्यांची विष्ठा यापासून दूर खेळत असल्याची खात्री करा.
जमीनीवर कृमी व किटक असू शकतात. तुम्हाला शक्य असेल तर तुमचे बाळ तिथे खेळण्यापूर्वी फरशी साबण व पाण्याने स्वच्छ करुन घ्या. यामुळे ते सुरक्षित राहील, व त्याला जंत होणार नाही. तुम्हाला फरशी स्वच्छ करता येणार नसेल तर खाली मोठी, स्वच्छ चटई किंवा सतरंजी घाला.
तुमचे बाळ उभे राहते व चालू लागते तेव्हा तुम्ही त्याच्या पायात मोजे किंवा चपला घातल्याची खात्री करुन घ्या. यामुळे त्याचे कृमींपासून संरक्षण होईल.
मागील महिना
पुढील महिना
Post a Comment