नुकत्याच आई झालेल्या स्त्रीने अश्या प्रकारे स्वतःची काळजी घ्यावी.
आई झाल्यावर बऱ्याच स्त्रियां आपल्या पिल्लांची काळजी घेण्याच्या नादात स्वतःची काळजी घ्यायचे विसरून जातात. पूर्ण दिवस आणि रात्र आपल्या बाळाला काय हवं नको ते बघणं त्याचा सगळ्या वेळा सांभाळणं. त्याची काळजी घेणे यामध्ये त्यांचा वेळ जात असतो. अर्थात हे सर्व खूपच रोमांचक असते परंतु या काळात आईने स्वतःची काळजी घेणे आणि ही घेण्यासाठी वेळ काढणे तितकेच महत्त्वाचे आहे.
पण हे कसे जमणार ? तर त्यासाठी आम्ही काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे नावामातांना आपल्या बाळाकडे व्यवस्थित लक्ष देऊन स्वतःसाठी थोडासा वेळ काढता येईल आणि स्वतःची काळजी घेता येईल
१. कुटूंबातील सदस्यांची मदत घ्या

या काळात कुटूंबातील सदस्यांची मदत मागायला संकोच करू नका. एका लहान मुलाला वाढवणे ही काही सोप्पी गोष्ट नाही त्यामुळे त्याकरता घरातल्या सदस्यांची मदत घेण्यास काहीच हरकत नाही. त्यांतून जर तुमच्या सासूबाई-किंवा सासरे किंवा तुमची आई किंवा इतर अनुभवी आणि जुने जाणते सदस्य तुमच्या मदतीला असतील तर उत्तमच. पण समजा जर असे कोणी सदस्य घरात नसतील तर घरातल्या इतर कामांसाठी एखादी कामवाली ठेवा. ज्यामुळे तुमच्या वरचा ताण कमी होईल आणि तुम्ही बाळाकडे पूर्णतः लक्ष देऊ शकाल
२. बाळ झोपल्यावर तुम्ही देखील झोप घ्या

बाळ दिवसभरात रडणं खाणे आणि झोपणे आणि शी-शु या करत असतं. यातला बराचसा भाग सुरवातीचे काही दिवस झोपेत घालवतं भले ते सलग झोपत नसले दोन दोन तासाचा अंतराने झोपत असेल पण सुरवातीला साधारणतः दिवसभरातील १२ ते १५ ते झोपते. अश्यावेळी तुम्ही ते झोपेल त्यावेळी तुम्ही देखील त्याच्या जवळ आराम करायचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा अराम देखील होईल बाळाकडे लक्ष ही देता येईल
३. आवश्यक वस्तू सतत जवळ असू द्या.

तुम्हांला सतत लागणाऱ्या गोष्टी तुमच्या आसपास असू द्या. ज्यामुळे तुम्हांला त्या सतत शोधव्या लागणार नाही. जसे पाणी, एखादा खाऊचा डब्बा, बाळाला लागणाऱ्या वस्तू म्हणजे जर तुम्ही आराम करत असाल आणि अचानक तुम्हाला काही गोष्ट लागली किंवा बाळ उठले तर त्याला लागणाऱ्या वस्तू आसपास असतील तर तुम्हांला उठावे लागणार नाही. आणि तुमच्या आराम मध्ये व्यत्यय येणार नाही
४. कामांचा प्राधान्यक्रम ठरावा

आपल्या कामाचा प्राधान्यक्रम करण्याचा एक मार्ग म्हणजे आपण काय करायचे आहे आणि आपण काय करू इच्छिता हे ठरविणे. या कामांच्या दोन स्वतंत्र सूची लिहा. त्या दरम्यान असलेल्या कामांची एक यादी बनवा. उदाहरणार्थ, स्तनपान करणे, आपल्या बाळाला झोपवणे तसेच बाळाच्या वेळापत्रकांनुसार इतर गोष्टी करणे किंवा बाळाची औषधें नॅप्पी किंवा काही औषधे मागवणे अश्या गोष्टींना आपल्याला आधी प्राधान्य द्यावे लागते.तसेच घराची साफ-सफाई किंवाघरातील इतर कमी नंतर होऊ शकतात, त्यामुळे कामाचा प्राधान्यक्रम ठरवल्यामुळे वेळ वाचतो आणि सगळी कामे वेळात होतात. आणि कामांचा ताण येत नाही. .
५. ताज्या हवेत जा
या काळात जास्त घराबाहेर पडू नका आणि आराम करा असा सल्ला डॉक्टर देतात. अश्यावेळी कोवळ्या उन्हात बसणे . थोडावेळ मोकळ्या हवेत जाणे यामुळे तुम्हांला प्रसन्न आणि ताजेतवाने वाटेल. परंतु अति वारा, अति उन्ह असलेल्या ठिकाणी जाऊ नका. थोडा वेळ चाला ,शतपावली करा यामुळे तुम्हांला प्रसन्न वाटेल
६. शारीरक आणि मानसिक ताण घेऊ नका
बाळाच्या जन्मांतर तुमच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी तुम्हांला तुमच्या शरीराला काही वेळ द्यावा लागतो. त्यामुळे बाळाच्या जन्मांनंतर काही दिवस आईने अति श्रमाचीकामे करणे टाळावे. याकाळातील अति अतिश्रम किंवा जास्त शाररिक कामं हे भविष्यात त्रासदायक ठरू शकतो . त्यामुळे याकाळात आईने योग्य ती काळजी आणि आराम करणे गरजेचे असते.
तर ,या काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी दिल्या आहेत आम्हांला खात्री आहे त्या तुम्हांला उपयुक्त ठरतील ! तसेच या टिप्स तुमच्या ओळखीच्या नुकत्याच आई झालेल्या स्त्रियांना जरूर शेअर करा.
Post a Comment