पार्टनरच्या घोरण्याने तुम्ही त्रस्त आहात.. या घरगुती उपायांनी मिळवा आराम
असं अनेकदा होत असेल की, पार्टनरच्या घोरण्यामुळे तुमची झोप पूर्ण होत नाही. अशावेळी तुमची इच्छा असूनही तुम्ही काही करू शकत नाही. याचा परिणाम म्हणजे दुसरा दिवस तुम्ही फारसे उत्साहात नसतात आणि पार्टनरसोबत तुमची बाचाबाचीही होते. यामुळेच आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे काही दिवसांत घोरण्यापासून तुमच्या पार्टनरची मुक्तता होईल.

- हळद हा अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. पण झोपण्याच्या अर्धा तास आधी हळदीचं दूध प्यायलं तर घोरण्यापासून आराम मिळू शकतो.

- झोपण्यापूर्वी पाण्यात पुदीन्याच्या तेलाचे काही थेंब टाकून गुळण्या करा. असं केल्याने नाकाच्या छिद्रांची सूज कमी होईल आणि श्वास घेणं शक्य होईल. नाकाला पुदीन्याचं तेल लावूनही झोपू शकता.

- एक कप कोमट पाण्यात एक चमचा हळद आणि एक चमचा मध घालून चांगल्या प्रकारे ढवळा. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे पाणी प्या. असं केल्याने काही दिवसांत यातून तुमची सुटका होईल.

- झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात वेलची पावडर घालून प्या. असं रोज केल्याने घोरण्याची समस्या दूर होऊ शकते.

- तसेच जर तुम्हाला घोरण्याची सवय आहे तर झोपण्याच्या अर्धा तास पूर्वीपर्यंत मद्यपान करू नका. याचा थेट परिणाम घोरण्यावर होतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. VR HEARING GROUP याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.