आजीबाईचा बटवा - बाल अरोग्य


लहान बाळांना दात येताना बऱ्याच वेळेला ताप येतो, पोट बिघडते. अशा वेळेला साधारण ६ व्या महिन्यापासून बाळाच्या हिरड्यांवर रोज मध चोळावे, दात व्यवस्थित येतात. या काळात पोट बिघडले असेल तर २ चमचे बडीशेप २ कप पाण्यात उकळून हा काढा. २ चमचे सकाळी आणि संध्याकाळी दयावा. या बडीशेपेच्या काढ्यामुळे बाळांना दूध पचते आणि भूक वाढते.

उपाय

  • डोळ्याची शक्ती वाढवण्यासाठी २ चमचे मधामध्ये गाजराचा रस मिसळून रोज हिवाळ्यात दिल्यास डोळ्यांना लाभदायक ठरते.
  • घाव भरण्यासाठी काळे तीळ वाटून त्यात मध मिसळून त्याचा लेप जखमेवर लावल्यास जखम भरण्यास मदत होते.
  • शरीराला भाजले असेल तर त्या ठिकाणी कोबीची स्वच्छ धुतलेली पाने ठेवून वरून स्वच्छ कापडाने ती जखम बांधून ठेवावी. रोज या जखमेवरील कोबीचे पान आणि कापड बदलावे. जखम पटकन भरून येते.
  • कुठल्याही प्रकारचे किडे चावल्यास त्यावर लगेच मध लावावे. चावलेल्या ठिकाणी सूज येत नाही व वेदना कमी होतात.
  • खूप उचक्या लागत असतील तर १ चमचा साजूक तुपात १ चमचा जिरे पूड घालून कालवून ठेवावे आणि उचक्या लागल्यावर चाटायला दयावे.

  • जिरे आणि धणे समप्रमाणात एकत्र करून ठेवावे. हे मिश्रण रोज जेवणानंतर बडीशेपेच्या ऐवजी खाल्ल्यास आम्लपित्तासारखे विकार बरे होतात.