चेहऱ्यावरील डाग घालण्यासाठी घरगुती उपाय पहा कोणता
शरीरात होणाऱ्या हार्मोन्स् बदलांमुळे चेहऱ्यावर मुरूम, whitehead, Blackheads येत असतात. चेहऱ्यावरील pimpls गेले तरीही त्याचे डाग आणि खड्डे आपल्या चेहऱ्यावर तसेच राहतात यामुळे आपला चेहरा खराब आणि निस्तेज दिसू लागतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत चेहऱ्यावरील डाग आणि खड्डे घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय.
चेहऱ्यावरील डाग आणि खड्डे घालवण्यासाठी थोडीशी मुलतानी मीठी त्यामध्ये समप्रमाणात लिंबाचा रस, गुलाबपाणी मिसळा अन हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावा.
अर्धा तास तसेच राहूद्या नंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन टाका. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्यावरील डाग आणि खड्डे कमी होतील.
चेहऱ्यावरील डाग आणि खड्डे घालवण्यासाठी रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर कोरफडाचा गर लावा. अन सकाळी झोपेतून उठल्यावर स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन टाका असे केल्याने चेहऱ्यावरील डाग आणि खड्डे नाहीसे होतील.
चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी कडूलिंबाची काही पानाची पेस्ट करून घ्या. त्यामध्ये थोडेसे गुलाबपाणी मिसळून आपल्या चेहऱ्यावर लावा.
10 – 15 मिनिट हा लेप चेहऱ्यावर सुकून द्या त्या नंतर चेहरा कोमट पाण्याने धुऊन टाका. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतील. त्याबरोबरच मुरूम हि येण्याचे प्रमाण कमी होईल.
चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी कच्च्या बटाटयाची पेस्ट करून घ्या. आपल्या चेहऱ्यावर लावा. 10 मिनिट तसेच चेहऱ्यावर सुकून द्या त्या नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. हा उपाय नियमित केल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतील. आणि आपला चेहरा ग्लो करू लागेल.
लक्षात ठेवा चेहऱ्यावर पिंपल्स आल्यास फोडू नका. पिंपल्स फोडल्यास बऱ्याच वेळा त्याचे डाग पडतात. चेहरा चांगला टवटवीत दिसावा म्हणून आपल्या आहारात फळ, हिरव्या पालेभाज्या यांचे सेवन करा. तेलकट, मसालेदार पदार्थ आहारातून कमी करा.
दिवसभरात कमीत कमी 2 / 3 लिटर पाणी प्या. पाणी आपल्या त्वचेवरील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. जेणेकरून आपला चेहरा ताजा तवाना दिसतो.
आपल्याला चेहऱ्यावरील डाग आणि खड्डे घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे Comment करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.
Post a Comment