नियमित मोड आलेले मुग खा ‘या’ दोन रोगांपासून सुटका

  नियमित मोड आलेले मुग खा ‘या’ दोन रोगांपासून सुटकाआरोग्य चांगले आणि निरोगी ठेवण्यासाठी दररोज एक मूठभर तरी मोड आलेले कडधान्य खाल्ले पाहिजे, असे डॉक्टर आपल्याला सांगतात. कारण, मोड आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक गुणधर्म राहत असून त्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कुठल्याही रोगापासून दूर राहण्यास मदत होते.

मात्र, अख्खे मुग किंवा मुगडाळ सर्व धान्यांमध्ये पौष्टिक समजली जाते. या डाळीमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी राहत असून व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई चे प्रमाण भरपूर असते. याशिवाय मॅग्नेशियम, कॉपर, फायबर, पोटॅशियम, लोह आदी पोषकद्रव्याचे प्रमाणही जास्त असते.

हे व्यवसाय कधीही बंद पडणार नाहीत

त्यामुळे या डाळीला स्प्राउटमध्ये अधिक महत्त्व देण्यात आले आहे. तर नियमित मोड आलेले मुग खाऊन कोणत्या दोन रोगांपासून तुमची सुटका होऊ शकते, ते जाणून घ्या…

🤰🏻 प्रेग्नन्सीत कारले खावे कि नाही? वाचा!

1. उच्च रक्तदाबास प्रतिबंद – उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी मोड आलेले कडधान्यांचे सेवन करावे. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये सोडिअमचे प्रमाण कमी असते. त्यामुळे मोड आलेल्या मुगाचे सेवन केल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रण राहण्यास मदत होते.

दो बच्चों के बीच कितनी समय का अंतर होना चाहिए?

2. कर्करोग होण्यास प्रतिबंद – मोड आलेल्या मुगामध्ये अमिनो अ‍ॅसिड पॉलीफेनॉल्स व ओलिगो सॅकेराइडचे प्रमाण असते. त्यामुळे आपल्या शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध घातला जातो.

3. तसेच, मोड आलेले मुग खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते. शरीरातील प्रतिकारक्षमता वाढण्यास देखील मदत होते. पोटाच्या विविध समस्यांवरही मोड आलेले मुग खाणे फायदेशीर ठरते.आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!